मालवाहू कंटेनर आणि हायवा ट्रक चा समोरासमोर भीषण अपघात झाला.या मध्ये कंटेनारचा कॅबिनचा चुराडा झालं तर हायवाची पूर्ण ट्रॉलीच उखडली.या अपघातात कंटेनरचालक गंभीर जखमी झाला ही घटना आज दुपारी मुंबई-नागपूर महामार्गावरील करोडी फाट्याजवळ घडली.
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई- नागपूर महामार्गवर कंटेंनर नाशिक च्या दिशेने जात जाते तर हायवा हे औरंगाबाद च्या दिशेने येत असताना करोडी फाट्याजवळ दोन्ही वाहने ही समोरासमोर भिडली.दोन्ही जड वाहने ही भरधाव वेगात होती. अपघात एवढा भीषण होता होता की, हायवा ची ट्रॉली ही साठ्यामधून उखडली तर कंटेनारचा कॅबिनचा चुराडा झाला.त्या मध्ये कंटेनर चालक अडकला होता.नागरिकांनी अडकलेल्या त्या चालकाला चुराडा झालेल्या कॅबिन मधून बाहेर काढले,चालक हा गंभीर जखमी असून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जखमीला रुग्णवाहिकेतुन घाटी रुग्णालयात हलविले, जखमी चालकाचे नाव समोर आले नसून पोलिसांकडून ओळख पाठविण्याचे काम सुरू होते.












